राज्यस्तरीय स्काऊट राज्यपुरस्कार चाचणीत घवघवीत यश

 राज्यस्तरीय स्काऊट राज्यपुरस्कार चाचणीत घवघवीत यश


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

 नाशिक (प्रतिनिधी )

दिनांक १४ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान हस्ती भवन येथे आयोजित राज्यस्तरीय स्काऊट राज्यपुरस्कार चाचणी (२०२५-२६) मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थी –वृषभ अणावकर, मानव शेलार, सार्थक वालझाडे, यश शिरसाठ,तन्मय पवार –या विद्यार्थ्यांना भाऊसाहेब भोंडवे, महेंद्र गावित व विकास खंबाईत यांनी मार्गदर्शन केले. स्काऊट विभागाच्या व शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक गुरुजनांचे हार्दिक अभिनंदन सर्वांचे आभार मानत सहकार्य व आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी,सहकार्यवाह शैलेश पाटोळे,यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

Previous Post Next Post