संविधान दिन साजरा तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

 संविधान दिन साजरा तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला .मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेबआहेर, सुनंदा कुलकर्णी,दिलीप पवार , मंगला मुसळे,रेखा महिरे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

           या कार्यक्रमाचे आयोजन इ 9 इ, 10 ड, 10 इ या वर्गाने केले त्यांना वर्गशिक्षिका अश्विनी भामरे, रेखा माहिरे, संगीता पाटील यांनी सहकार्य केले.या प्रसंगी शालेय विद्यार्थीनी तायबाखातून हसन, हर्षाली हिरे, मनस्वी बोरे यांनी संविधान दिनाचे महत्व सांगितले.इ 9 वी इ च्या विद्यार्थांनी संविधान गीत तर 10 वी च्या विद्यार्थांनी पटनाट्य सादर केले. मधुकर हिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित प्रश्नमजुषा स्पर्धा घेण्यात आली. पर्यवेक्षक सूर्यभान जगताप व ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संविधानात दिलेले अधिकार व कर्तव्य याबद्दल माहिती सांगितली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्तविकेचे सामुहिकरीत्या वाचन केले. प्रसंगी 26 नोव्हेबर मुंबई ताज हॉटेल येथे झालेल्या दहशादवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक राजेंद्र कापसे तसेच संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का कुशारे, ऋतुजा बोरसे हिने केले तर आभार वेदिका ओव्हार हिने मानले.

Previous Post Next Post