सेवापूर्ती सोहळा संपन्न
नाशिक - नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे क्रीडा शिक्षिका सौ.मंगला मुसळे यांचा सेवापूर्ती सोहळा संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्रा.दिलीप फडके,संस्था कार्यवाह राजेंद्र निकम ,संस्था कार्यकारिणी सरोजिनी तारापूरकर , माजी शिक्षण उपसंचालक . पी एस मुसळे,संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, उमेश कुलकर्णी, पंढरीनाथ बिरारी,मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ, सहसचिव सारिका परदेशी, तसेच संस्थेच्या विविध शाळेतील मुख्याध्यापक ,शिक्षक ,सेवानिवृत्त झालेले सहकारी शिक्षिका, सौ मुसळे यांचे कुटुंबीय , नातेवाईक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले .सत्कारमूर्तींचा परिचय उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी करून दिला. तसेच संस्था अध्यक्ष प्रा दिलीप फडके, संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे,संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी सौ मंगला मुसळे यांना सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ शिक्षिका प्रिया कुलकर्णी , चारुशीला पत्की, मेघा तायडे, त्यांचे पती मुकुंदा मुसळे, मुलगी सौ मयुरी अमृतकर, मुलगा शुभम मुसळे, सून सौ वृषाली मुसळे, बहिण रेखा चिंचोरे यांनी सत्कारमूर्ती यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. रसिका कुलकर्णी व अबोली अकोलकर, गीतमंच यांनी स्वागतगीत सादर केले.सत्कारमूर्ती सौ मंगला मुसळे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या एकूण सेवा काळातील अनुभव व्यक्त केले व संस्थेविषयी शाळेविषयी ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली अकोलकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी मानले .या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
