स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली व त्यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

           या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ शिक्षिका चारूशीला पत्की व हेमलता खंबाईत, मिनाक्षी मारवाडी यांनी केले .याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी , पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शिक्षिका रसिका कुलकर्णी यांनी सावरकरांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्याना दिली व मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक इ.५ वी क ची विद्यार्थीनी कु.आराध्या माळी ने केले तर शालेय विद्यार्थी कु. राजश्री गांगुर्डे, शुुक्रा मराठे , सृष्टी चव्हाण, ईश्वरी गोथाड, शर्वरी गोथाड,जय राठोड, आराध्या गाढे, युक्ता पाटील,राजवी भरपूरे , वैदेही कुवळेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी विद्यार्थ्याना माहिती सांगितली . याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली

सूत्रसंचलन इ.५ वी' क' ची विद्यार्थिनी कु.मेघना बेडिस्कर, यांनी केले तर आभार कु. हर्षवीता बस्ते हिने मानले.

Previous Post Next Post