संविधानाचा सन्मान – लोकशाही मूल्यांची जाण ” पेठे विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

 “ संविधानाचा सन्मान – लोकशाही मूल्यांची जाण ”

 पेठे विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त लोकशाही मूल्यांची उजळणी, कर्तव्यांची जाणीव आणि अधिकारांचे भान विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रांगणात झालेल्या सामूहिक संविधान प्रास्ताविकेच्या पठणाने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी पूनम वाल्हेकर आणि अवधूत मानकर यांनी समर्थपणे पार पाडली. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून वेद प्रयागे, सोहम रोंगटे आणि समर्थ जाधव यांनी संविधानाचे महत्त्व, नागरिकत्वाची जाणीव आणि आधुनिक भारतातील लोकशाहीची गरज प्रभावीपणे मांडली.संविधान उद्देशिका वाचनाची भूमिका प्रेमानशू तमखाने यांने निभावली.कार्यक्रमात लवेश कागडा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेचे सुंदर सादरीकरण करून विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधले.अध्यक्षीय मनोगतात शरद शेळके  विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांच्या पालनाचे आणि कर्तव्यांचे महत्त्व पटवून दिले. सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी संविधान निर्मिती प्रक्रिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये यांबद्दल उपयुक्त माहिती दिली.

या निमित्ताने शाळेत प्रश्नमंजुषा, निबंध लेखन आणि पोस्टर स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “आपले संविधान – आपला अभिमान” असा संदेश देत लोकशाही आदर्श जपण्याची प्रतिज्ञा केली.प्रमुख मार्गदर्शक भरत भलकार यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत कर्तव्यांचे पालन करून सुजाण नागरिकत्व वाढवण्याचे आवाहन केले.तर  मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी संविधान उद्देशिका विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतली.विद्यार्थ्यांनी एकसुरात उद्देशिका वाचत स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या लोकशाही तत्त्वांचा दृढ संकल्प केला.

.या कार्यक्रमास मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, शिक्षिका शर्मिला खानिवाले, भरत भलकार, अजित निखाडे, सुनील हयाळीज, दीपक कडाळे  उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन मनीष जोगळेकर आणि गायत्री पालवे यांनी केले. आभारप्रदर्शन भागवत सूर्यवंशी आणि सार्थक आहेरराव यांनी केले संविधान दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक आणि नागरिकत्वाची जाण दृढ करणारा ठरला.

Previous Post Next Post