सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय च्या जय घोषात अश्वाने बारा गाडे ओढले आणि लगेचच ओझरच्या यात्रेस झाला प्रारंभ

 सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय च्या जय घोषात 

अश्वाने बारा गाडे ओढले आणि लगेचच ओझरच्या यात्रेस झाला प्रारंभ  

भंडाऱ्याच्या उधळणीने आसंमत झाला पिवळा   


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर : वार्ताहर

 जेजुरी नंतर महाराष्ट्रातील ओझर मिग येथे भरणाऱ्या व जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण असणाऱ्या ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी माणसांनी खचाखच भरलेले बारागाड्या यात्रा मैदानात आल्या नंतर सांयकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास मानाचा मल्हार नांवाचा अश्व मोंढा गाड्यास जुंपुन मोंढा गाडा व मानाच्या अश्वाचे आमदार दिलीप बनकर यांचे हस्ते पुजन करण्यात आले आणि लगेचच भंडार्याची उधळण होऊन सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अशा जयघोषाचा एकाच निनाद झाला आणि पहाता पहाता मानाच्या अश्वाने लाखो भाविकांच्या साक्षीने बारा गाडे ओढून नेले यानंतर खरा यात्रेस प्रारंभ झाला.   

  जेजूरी नंतरची जिल्हयातील पहिली मोठी ओझरच्या श्री खंडेराव महाराजांची यात्रेच्या प्रारंभी आज पहाटे ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यांच्या मंदिरातील मुर्तीना श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर व मनीषा खेडेकर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रिया देशमुख यांचे हस्ते मंत्रघोषात दुग्धाभिषेक करून श्री हरिद्रामार्चन पूजा व महाआरती सिने अभिनेते श्रीश व दर्श राजेंद्र खेडेकर व यात्रा कमेटी मानकरी आदी मान्यवरांचे यांचे उपस्थितीत करण्यात आली मांडव डहाळे कार्यक्रम ही झाला हजारो भाविक भक्त सकाळपासून खंडेरायाच्या चरणी लिन होऊन वांग्याचे भरित आणि बाजरीच्या भाकरीचा नैवद्य अर्पण करून रांगेत उभे राहून खंडेराव महाराजांचे दर्शन घेत होते

 अश्वाद्वारे ओढल्या जाणाऱ्या बारा गाड्यावर सुशोभित फिरणारे एक चाक बसवलेले होते या चाकावर लाकडी चोपा बांधून प्रत्येक टोकाला अडकविलेल्या सोडग्यावर शरीरसौष्ठव असलेले मल्ल कसरत करतानाचे द्रुष्य भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडताना दिसत होते.या बारा वाड्यातील बारागाड्यामध्ये विष्णु बापू पगार यांचा मानाचा गाडा (देवाचा गाडा) प्रथम उभा होता त्यानंतर शेजवळवाडी, सोनेवाडी, भडके वस्ती, पगार गवळी, वरचा माळी वाडा, मधला माळीवाडा, क्षत्रिय मराठा समाज, समस्त कदम मराठा समाज, शिंदे, चौधरी वस्ती, सावता नगर, सायखेडा रोड, आण्णासाहेब भडके वस्ती आदी वाड्यांतील गाड्यांचा समावेश होता या बारा गाड्या गांवातून वाजत गाजत मिरवणूकीने सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यात्रेच्या ठिकाणी यात्रा मैदानात आल्यानंतर बारा गाड्या एकमेकांना जोडण्यात आल्या तत्पूर्वी मानाच्या अश्वाची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढुन बाणगंगा नदीपात्रातील पाण्यात मानाच्या घोड्याचे पाय धुऊन तेथे पूजा करून त्यास बारागाड्या ओढण्याच्या ठिकाणी आणण्यात आले अश्वास बारागाड्यांना जुंपुन बारागाडे व अश्वाची मान्यवरांचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय असा एकच निणाद झाला आणि पहातापहाता मानाच्या मल्हार अश्वाने लाखो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढून नेल्या यावेळी खंडेराव महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता व संपूर्ण परिसर भंडार्याच्या उधळण्यामुळे पिवळा झाला होता यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख नगरपरिषदेचे अधिकारी प्रशांत पोतदार प्रतिक उंबरे योगेश गोरे हर्षद पगार कैलास ठुबे माजी आमदार अनिल कदम ,रामराव गवळी बाळासाहेब कदम धमेंद्र जाधव मोतीराम शेळके अाओमकोचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे शिवतेजचे संस्थापक व मोंढा गाड्याचे मानकरी भारत पगार यात्रा कमिटीचे अध्यक्ष परशराम शेलार उपाध्यक्ष उमेश देशमुख. बापू चौधरी सतीश पगार शिवा शेजवळ दत्तू घोलप रामू पाटील कदम धनंजय पगार अशोक शेलार कैलास जगझाप प्रशांत पगार कामेश शिंदे प्रशांत चौरे पराग बोरसे दत्तू लवांडे भूषण कदम संजय शिंदे विक्रम शेजवळ शरद शेजवळ किशोर त्रिभवन संजय भडके राहुल खाडे नाना शेलार कांचन जाधव भास्कराव तासकर धोंडीराम पगार भगवान भागवत राजाभाऊ दहाडदे सिताराम पगार विनोद जाधव नितिन जाधव कैलास जगझाप गौरव शिवले मोतीराम शेळके सतीश भागवत युवराज शेळके आदिंसह नागरिक व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपरिस्थित होते

या कार्यक्रमानंतर घरोघरी तळी भरण्यात आली

 यात्रा काळात समाज कंटकांवर व भुटर्यावर नजर ठेवण्यासाठी यात्रा परिसर व मुख्य ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असुन 

यात्रे साठी ओझरचे पोलिस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिसासह मुख्यालय व वाहातुक शाखा कर्मचारी ,होमहार्ड,गोपनीय विभाग, एल सी बी चे पोलिस कर्मचारी आदिं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे


उद्या पासूनचाम कार्यक्रम :


गुरुवार तारीख २७ सकाळी ७ वाजता देव हजेरी व दुपारी 3 वाजेपासून सोनेवाडी रोड येथे कुस्ती दंगल व विजेत्या मल्लांना बक्षिस वाटप शुक्रवार दि २७ बैल गाडा शर्यत असा आयोजित कार्यक्रम होणार आहे 

फोटोसाठी - श्री खंडेराव महाराज यात्रेतील महत्वाचा बारा गाडे ओढतानाचा क्षण व मंदिरात दर्शनासाठी झालेली गर्दी

Previous Post Next Post