कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन

 कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

निफाड तालुका विधी सेवा समिती व पिंपळगाव बसवंत न्यायालय तसेच पिंपळगाव बसवंत वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार तारीख 27/ 11/ 2025 रोजी दुपारी ठीक 3 वा ओझर येथील खंडेराव महाराज मंदिर यात्रेत उपस्थित असलेल्या तृतीयपंथीय व भाविकांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन केले होते.

      यावेळी सदर शिबिरात पिंपळगाव बसवंत वकील संघाचे सचिव एडवोकेट सुभाष शेलार, एडवोकेट प्रवीण हाडोळे, अडवोकेट वैशाली बाविस्कर, अडवोकेट भूषण जाजू , एडवोकेट पुनम गांगुर्डे, एडवोकेट प्रतीक बनकर यांनी उपस्थितांना भारतीय राज्यघटनेने तृतीय पंथीयांसह प्रत्येक व्यक्तीस दिलेल्या मूलभूत शैक्षणिक हक्क व अधिकार या विषयी माहिती दिली.        

       याप्रसंगी तृतीयपंथी व्यक्ति नामे हेमा , खुशी, चांदणी , कोमल, इत्यादी हजर होते 

      तसेच यात्रेत उपस्थित दर्शना साठी आलेल्या भाविकांनी देखील सदर शिबिराचा लाभ घेऊन त्यांना जुजबी का होईना मिळाल्या कायदेविषयक माहिती बद्दल उत्स्फूर्त दाद दिली.

     सदर उपस्थितांनी अशी मागणी केली की अशा प्रकारचे कायदेविषयक शिबिर हे वेळोवेळी घेऊन समाजामध्ये कायदेविषयक जनजागृती करणे काळाची गरज आहे व त्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक ते सहकार्य करण्याची त्यानी तयारी दर्शवली.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडवोकेट प्रवीण हाडोळे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अडव्होकेट सुभाष शेलार यांनी केले. तसेच एडवोकेट पुनम गांगुर्डे, अडवोकेट वैशाली बाविस्कर, एडवोकेट प्रतिक बनकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी तृतीयपंथी व्यक्तींपैकी कोमल ही पदवीधर असून तिने आपल्या भावना व्यक्त करताना सदर कायदेविषयक शिबिराचे तोंड भरून कौतुक केले.

      तसेच तृतीय पंथीयांना ज्या ज्यावेळी कायदेविषयक मार्गदर्शनची व मदतीची गरज भासेल त्या त्यावेळेस त्यांनी तालुका विधी सेवा समिती पिंपळगाव बसवंत यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपस्थित विधीज्ञानी केले.यावेळी न्यायालयाचे प्रतिनिधी रोहित बाविस्कर भाऊसाहेब उपस्थित होते. अडवोकेट भूषण जाजू यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post Next Post