माध्यमिक विद्यालय,उंटवाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना १३५ वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
नाशिक :- नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची१३५ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली . त्यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपमुख्याध्यापक विजय मापारी पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ , सूर्यभान जगताप,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर , ज्येष्ठ शिक्षक प्रवीण जाधव,जेष्ठ शिक्षिका प्रणाली देशपांडे, रेखा महिरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन इ १० वी फ व इ.१० वी क च्या वर्गाने केले .त्यांना सहकार्य वर्गशिक्षक रफिक इनामदार व हेमंत भूसारे यांनी केले .शालेय विद्यार्थी चि.आदित्य कुंभार,ओम जाधव ,कु.परी बच्छाव यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवकार्याविषयी माहिती सांगितली तर कु.पायल टेकुडे,गौरी सोनार यांनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी शशिकांत दंडगव्हाळ व ज्येष्ठ शिक्षिका प्रणाली देशपांडे,रेखा महिरे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्याना माहिती सांगितली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रि़ध्दी शिरोडे हिने केले तर आभार नंदिनी निकम या शालेय विद्यार्थ्यानी केले . याप्रसंगी नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

