महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी : सामाजिक समतेचा संदेश कार्यक्रम पेठे विद्यालयात संपन्न
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात दिनांक २२ नोव्हेंबर रोजी समाजसुधारक, सत्यशोधक आणि शिक्षणक्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजलीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. साहिल नागपूरे यानी स्वागत व प्रास्ताविक केले.तदप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, भरत भलकार आणि भाऊसाहेब भोंडवे तसेच बापू कडाळे, बापू चव्हाण, पूनम वाल्हेकर, शर्मिली खानिवाले, राजश्री मुळे, अजित निखाडे, प्रशांत साबळे, पंकज वेल्हाणकर यांसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला औचित्य प्राप्त झाले.
पूनम वाल्हेकर यांनी महात्मा फुले यांचे विचार विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले, तर पर्यवेक्षक सूर्यवंशी यांनी जीवनकार्याची सांगड आजच्या सामाजिक परिस्थितीशी घालत विद्यार्थ्यांना चिंतनासाठी प्रवृत्त केले.त्यानंतर ऋषिकेश सोनोने यांनी महात्मा फुले यांच्या जीवनपटाचे प्रभावी सादरीकरण केले. श्रीनिवास बुवा यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडत परिवर्तनाची ज्योत जागवली.
प्रमुख पाहुणे भरत भलकार आणि भाऊसाहेब भोंडवे प्रमुख वक्त्यांनी समता, न्याय आणि शिक्षण या मूल्यांच्या उपयुक्ततेवर विद्यार्थ्यांना विचार सांगून महात्मा फुले यांचे आदर्श कार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडत मार्गदर्शन केले.तसेच महात्मा फुले यांनी उभारलेल्या शिक्षणप्रसार, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, जातिनिर्मूलन आणि शेतकरी हक्कांच्या लढ्याचा उल्लेख करत त्यांना 'क्रांतिसूर्य' ही उपाधी का मिळाली हे प्रभावीपणे मांडले.सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता आणि शिक्षणप्रसाराचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या या कार्यक्रमात "ज्ञान, समता आणि सामाजिक परिवर्तन" यांचा प्रभावी संदेश उमटला.
कार्यक्रमाध्यक्ष शेळके सर यांनीही प्रेरणादायी शब्दातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे आवाहन केले.समारोप प्रसंगी हयाळीज सर यांनी उपस्थित मान्यवरांचा पेन देऊन गौरव केला, तर आभार प्रदर्शनाचे कार्य बापू चव्हाण यांनी केले. शेवटी दोन मिनिटे मौन पाळून महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आणि कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली

