पाथर्डी फाटा परिसरात नळ कोरडे;अन् टाक्या रिकाम्या

 

पाथर्डी फाटा परिसरात नळ कोरडे;अन् टाक्या रिकाम्या 


पाणी प्रश्ननी नागरिक आक्रमक; पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा 

नाशिक:- पाथर्डी फाटा येथील प्रभाग क्रमांक १२ मधील ओम साई रो हाऊस येथील १ते १२मधील नागरिकांना गेली पाच ते सहा वर्षांपासून पाणी प्रश्न भेडसावत असून याबाबत वारंवार आँनलाईन, मेसेज द्वारा लेखी तक्रार करून देखील पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला नाही त्यामुळे लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदन द्वारे विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांना निवेदन द्वारे देण्यात आला याप्रसंगी सुरेश सोनवणे, वैशाली साळुंके,रेखा चव्हाण, वैशाली जडे, वैशाली पवार, प्रमिला चव्हाण,सरला पाटील, कल्पना चव्हाण, दिलीप पवार, महेंद्र बोरसे,भारत चव्हाण , विनायक जडे इत्यादी नागरिक उपस्थित होते 

 धरणात मुबलक पाणी साठा असताना देखील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे प्रभागात पाणी कधी कमी वेळ येते व तेही कमी दाबाने , तसेच काही वेळा पाच,सहा दिवस पाणी येत नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा मुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे महिलांना, ज्येष्ठांना अणि लहान मुलांना दररोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून लवकरात लवकर पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली न निघाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदन द्वारे देण्यात आ

ला.

Previous Post Next Post