स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आत्मार्पण दिनी विनम्र अभिवादन

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आत्मार्पण दिनी विनम्र अभिवादन



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी) :

नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक संचलित पेठे विद्यालय, नाशिक येथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे थोर क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.दि.२६ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, अजित निखाडे, अमोल जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या देशभक्तीपर विचारांचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या त्यागाचा गौरव करण्यात आला.अभिनव भारत संघटना कार्य,क्रांतिकारक चळवळ, सावरकरांचे योगदान व कार्य या विषयी अजित निखाडे यांनी माहिती सांगितली तर हिरोशिमा–नागासाकीच्या विनाशकारी प्रसंगाची अमोल जोशी यांनी आठवण करून देत युद्धाचे दुष्परिणाम, अण्वस्त्रांची भयावहता आणि जागतिक शांततेचे महत्त्व अधोरेखित केले.मानवतेच्या रक्षणासाठी संयम, संवाद आणि शांततेचा मार्ग स्वीकारणे हाच खरा राष्ट्रधर्म असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला..स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

Previous Post Next Post