सागरमल मोदी शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक-मानसिक विकासासाठी तसेच स्पर्धात्मकता व टीमस्पिरिट वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यवाह राजेंद्र निकम यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून पेठे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कैलास पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक जयवंत बधान, संस्था सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी, शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे, दुपार सत्र प्रमुख मनीषा जोशी, क्रीडा समिती प्रमुख राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, हनुमंतरायाच्या मूर्तीचे पूजन आणि नारळ वाढवून शुभारंभाने झाली. फुग्यांचे लोकार्पण करून क्रीडा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी जम्प रोप, ५० मीटर धावणे, शटल रन, लंगडी-पळी, बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्तम क्रीडास्पिरिट दाखवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रमुख अतिथी कैलास पाटील व उद्योजक जयवंत बधान यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन बाळगण्याचा, नियमित व्यायाम करण्याचा आणि पराभव-यश या दोन्हींकडे समानतेने पाहण्याचा संदेश दिला.
मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांना यशस्वी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
दुपार सत्रातील बक्षीस वितरण समारंभात सी.डी. मेरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मधुकर पगारे व उंटवाडी प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उज्वला कासार प्रमुख उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना पदके व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
उपस्थित मान्यवर शाळेतील शिक्षक अश्विनी पगार, मंजुषा झेंडे, प्राजक्ता क्षीरसागर,नीलिमा गायधनी, किशोरी शुक्ल,उषा जोपळे, भावना नागपुरे,मनीषा कापसे,क्रांती बोराटे,स्वाती महाजन, रेखा जंत्रे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आली. क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बाविस्कर मान्यवरांचा परिचय हर्षल कोठावदे यांनी करून दिला. क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पाटील व मान्यवरांचा परिचय प्रशांत केंदळे यांनी करून दिला. उपस्थित मान्यवरांचे आभार क्रीडा समिती प्रमुख राहुल चव्हाण यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी गणेश गांगोडे, निलेश चव्हाण, छाया जाधव, कविता भामरे, मंगला बनकर, सुषमा यादव, सारिका सूर्यवंशी कल्पना जोपळे ,जयश्री भडके, तेजश्री बुवा यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या सहकार्यामुळे यंदाचा क्रीडा महोत्सव संस्मरणीय ठरला.


