“सर्जनशीलतेला उजाळा देणारी निबंध–रांगोळी स्पर्धा पेठे विद्यालयात उत्साहात संपन्न
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक -नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, नाशिक यांच्या वतीने आयोजित निबंध व रांगोळी स्पर्धा नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांमध्ये कला, विचारशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, तसेच सहकार्यवाह शैलेश पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमात सहा विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम लिखित ‘अग्निपंख’ हे प्रेरणादायी पुस्तक पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचे प्रोत्साहन करण्यात आले.अंजली येवले मॅडम यांनी बँकेचा परिचय अत्यंत सोप्या व माहितीपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना करून दिला.त्रिगुण कुलकर्णी यांनी “बचतीचे महत्त्व” विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल अशा प्रभावी शब्दांत समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती पुनम वाल्हेकर यांनी कुशलतेने पार पाडले.उपस्थित गुरुजन –. अजित निखाडे ,भरत भलकार, बापू चव्हाण,प्रशांत साबळे आणि राजश्री मुळे टीचर यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या अखेरीस मुळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.विशेष म्हणजे, सामाजिक भान जपणाऱ्या या उपक्रमाबद्दल नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून विद्यालयाला ‘विशेष कृतज्ञता सन्मानचिन्ह’ म्हणजेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच बळ मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
