सी.डी.ओ मेरी हायस्कूल शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

सी.डी.ओ मेरी हायस्कूल शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक प्रतिनिधी -२६ नोव्हेंबर हा संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.हा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र हात्ते प्रमुख अतिथी क्रीडा शिक्षक पुंडलिक शेंडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिना विषयी माहिती सांगितली. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक अनिल पवार, रघुनाथ महाले,अनुराधा सोनवणे,श्वेता देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नितीन जाधव यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. स्वागत व प्रस्ताविक शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी कातकडे हिने केले.संविधान उद्देशिकेचे वाचन चैतन्य पगारे यांनी केले. विद्यार्थी मनोगत मध्ये जास्वंदी राव,प्रणव सोनवणे,पृथ्वी नांदुसेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात नाटिका सादर करण्यात आली.स्त्रियांबद्दलच्या कलमांचे वाचन अनुष्का थविल व मुकुंद कोकाटे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन ओवी काशीकर,अक्षरा देशमुख,ऋता ठाकरे, सृष्टी भुजबळ,अजिंक्य जगताप,रोहित लहानगे, सुजितकुमार पंडित, विठ्ठल वाघमारे,गणेश शिरसाठ,कृष्णा खाडेकर,श्याम सोनवणे,सुदाम बनसोडे, ऋषिकेश दहातोंडे,चेतन वाघेरे या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल सानप व अश्विनी कुलकर्णी तर आभार अक्षरा बोचरे विद्यार्थिनीने मानले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Previous Post Next Post