माध्यमिक विद्यालय,उंटवाडी येथे इ.10 वी सदिच्छा समारंभ संपन्न
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता 10 वीच्या विद्यार्थांचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, माजी मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, माजी विद्यार्थी समाधान नागरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे ,उपमुख्याध्यापक विजय मापारी , पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,शशिकांत दंडगव्हाळ , शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ ,शालेय पंतप्रधान रूद्र घरटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे राजेंद्र निकम, ज्योती कुलकर्णी, समाधान नागरे यांनी नियमित अभ्यास करा, अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा. करिअर चे योग्य क्षेत्र निवडा असा सल्ला दिला व विद्यार्थांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ, जेष्ठ शिक्षक नितीन धायगुडे यांनी करून दिला. शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर , ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले .शालेय विद्यार्थी शांभवी नेटावटे, हर्षली हिरे, आदित्य कुंभार, रूद्र घरटे, श्रेया वाघ, पायल टेकुडे, वेदांत देशपांडे, साई हुजरे, गौरी सोनार, कल्याणी गवळी यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव सांगितले व शाळेबद्दल ऋण व्यक्त केले.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्ञानज्योतीचे आदान प्रदान करण्यात आले त्याचे निवेदन मधुकर हिंडे यांनी केले.रसिका कुलकर्णी, अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सुपे यांनी केले तर आभार हेमंत भुसारे यांनी मानले. सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


.jpg)

