माध्यमिक विद्यालय उंटवाडीच्या शिक्षकांना जिल्हास्तरीय गुणवंत स्काऊट गाईडर पुरस्कार
नाशिक:- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेतील शिक्षक सुरेंद्र साबळे, तोष्णा ठाकूर, मिनाक्षी महाले यांची जिल्हास्तरीय गुणवंत स्काऊट गाईडर म्हणून निवड करण्यात आली असून नाशिक भारत स्काऊट गाईड यांच्या वतीने जागतिक चिंतन दिनानिमित्त प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व उंटवाडी परिवाराच्यावतीने अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्यात
.jpg)