माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे हिंदी की चादर उपक्रम
नाशिक:- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी की चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शाळांमध्ये गुरू तेज बहादूर यांच्या ३५० शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांच्या कार्या व इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी शाळेत माहितीपट प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, प्रभात फेरी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्पर्धा परीक्षा घेऊन जनजागृती करण्यात आली उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील हिंदी विभाग प्रमुख नवनीत सहारे, चैतन्य सोनवणे, यांनी विशेष परिश्रम घेतले
.
