सी.डी.ओ मेरी शाळेत चिंतन दिन उत्सहात साजरा

 सी.डी.ओ मेरी शाळेत चिंतन दिन उत्सहात साजरा 


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ना.ए.सोसायटीचे सी डी ओ मेरी शाळेत मोठ्या उत्सहात संपन्न झाला.लॉर्ड रॉबर्ट बेडन पॉवेल यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या प्रसंगी संस्था कार्यवाह राजेंद्र निकम उपस्थित होते.कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या व जेष्ठ शिक्षिका तारा घोटेकर यांनी विद्यार्थ्यांना चिंतन दिना विषयी माहिती समजून सांगितली.विद्यार्थ्यांनी स्काऊटच्या नियमांचे दैनंदिन जीवनात उपयोग करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र हात्ते यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे महत्त्व समजून सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर पर्यवेक्षक सुनिल घोलप,मनीषा साळवे,ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा जाधव,भारती भोये,भारती हिंडे व्यासपीठावर उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थिनींनी स्काऊट गाईड प्रार्थना सादर केली. कांचन खेताडे यांनी बेडन पॉवेल यांच्या विषयी माहिती सांगितली.नमस्कार शिंदे यांनी विद्यार्थ्यांना टाळ्यांचे विविध प्रकार व कविता म्हणून दाखविल्या. शोभा भदाणे यांनी विद्यार्थ्यांकडून वचन प्रतिज्ञा म्हणून घेतली. विजया देशमुख यांनी स्काऊट गाईडचे नियम सांगितले.कल्पना पवार यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडचे शैक्षणिक महत्त्व पटवून सांगितले.सुजाता पवार यांनी स्काऊट गणवेश याविषयी माहिती सांगितली.सूत्रसंचालन काशिनाथ दळवी व नीलम पाटील यांनी केले.स्काऊट/गाईड विभाग प्रमुख राजेंद्र पारधी,यशश्री रत्नपारखी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.मान्यवरांचे आभार आरती ठकार यांनी मानले.शाळेतील सर्व स्काऊट/गाईड शिक्षकांनी कार्यक्रमास सहकार्य केले.सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post