प्राथमिक विद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पराक्रमांचा जल्लोष

 प्राथमिक विद्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या पराक्रमांचा जल्लोष


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक:-प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री सोनवणे शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंखे ज्येष्ठ शिक्षिका सुनिता बोडखे इतर सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका व मंचावरील मान्यवरांनी सरस्वती पूजन व शिवरायांचे प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लावण्या अमृतकर हिने केले. अमृता गायकवाड राधिका महाले देवांशी मोरे या विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी भाषणे केले. दियांक वाडीले याने इंग्लिश मध्ये तर कल्याणी मासरे हिने हिंदी मध्ये भाषण केले. पियुष पाटील याने पोवाडा सादर केला तर शौर्य वाघ याने गरजे गरजे- थीम सॉंग सादर केले. दिया पाटील हिने सईबाईंची वेशभूषा करून विद्यार्थ्यांची संवाद साधला. पुष्पक कोल्हे याने शिवरायांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांसमोर मी शिवराय बोलतो हे मनोगत व्यक्त केले. वर्गातील विद्यार्थिनींनी आम्ही शिवकन्या हे गाणे सादर केले. विद्यार्थ्यांनी शिवरायांचे जीवनचरित्र नाट्यीकरणातून सादर केले. नाट्यीकरणात स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शिवरायांचा राज्याभिषेक असे प्रसंग दाखवण्यात आले.मुख्याध्यापिका बोरसे मॅडम यांनी शिवरायांचे अंगी असलेले दूरदृष्टी, रत्नपारखी असे अनेक गुण विद्यार्थ्यांना उदाहरणातून सांगितले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या अंगी असलेल्या गुणांचा अवलंब करावा असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या बालपणीच्या गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाचे आभार निलय कुलकर्णी याने मानले. कार्यक्रमाचे नियोजन भगवंत महाले यांनी केले होते.

Previous Post Next Post