माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे शिवजयंती निमित्ताने शिवरायांना अभिवादन

माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे शिवजयंती निमित्ताने शिवरायांना अभिवादन



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक विजय मापारी,पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, प्रमुख वक्ते पुनम कुमावत ,ज्येष्ठ शिक्षक प्रवीण जाधव, रफिक इनामदार, हेमंत भुसारे, ज्येष्ठ शिक्षिका मंगला मोरे, दिपाली पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.

           या कार्यक्रमाचे आयोजन इ ६ वी ड च्या वर्गातील विद्यार्थांनी केले. त्यांना सहकार्य वर्गशिक्षक नवनीत सहारे, अश्विनी काळे, सुनील कुलकर्णी यांनी केले.याप्रसंगी शालेय विद्यार्थी कु. जान्हवी गांगुर्डे, चि.दर्शन खैरनार,कु. धनश्री वाघ, चि. हर्ष सोनवणे, कु. तनया दराडे,कु.स्वरा गुंजाळ ,कु.अदिती नळे, पल्लवी भामरे , हर्षदा सोनवणे, हेमांगी माळी या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा विद्यार्थ्याना सांगितली .मुख्याध्यापक राजेंद्र कापसे , उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, ज्येष्ठ शिक्षक कैलास पाटील, प्रिया कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांची दूरदृष्टी , नियोजन , पराक्रम याबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. 

तर इ.९ वी इ तील विद्यार्थ्यांनी नाटिकेच्या माध्यमातून समाजातील वास्तव रुप व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता याची माहिती सादर केली त्यांना मार्गदर्शन शाळेतील शिक्षिका अश्विनी भामरे यांनी केले ६वी ड विद्यार्थ्यांनी पाळणा गीत सादर केले ,तर इयत्ता ७ वी क,इ.८ वी ई तील विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला श्री बडगुजर,शाश्वती बोराडे या विद्यार्थ्यांनी साहसी खेळ सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मधुकर हिंडे यांनी केले तर आभार चेतन सोनवणे यांनी मानले.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी विद्यार्थी राजमाता जिजाऊ , शिवाजी महाराज यांच्या वेशभूषा करून आले होते.

Previous Post Next Post