पेठे विद्यालयात 'हिंद दी चादर' उपक्रम अंतर्गत स्पर्धा परीक्षाचे आयोजन उत्साहात

 पेठे विद्यालयात 'हिंद दी चादर' उपक्रम अंतर्गत स्पर्धा परीक्षाचे आयोजन उत्साहात




महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी)

 नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालय नाशिक येथे शाळा समिती अध्यक्ष देवदत्त जोशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड,पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी,सहकार्यवाह शैलेश पाटोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली "हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहिब" यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त शाळेत स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता 

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष स्पर्धा परीक्षा आयोजित करण्या अगोदर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये गुरु तेग बहादूर साहेब यांच्या जीवनाचीकार्याची माहिती माणिक गोमासे सरांनी विद्यार्थ्यांना दिली,त्यानुसार विषयानुरूप विद्यार्थ्यांना MCQ टाईप प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ते अतिशय कुशलतेने आणि उत्साहाने अभ्यासामुळे सोडवण्याचा प्रयत्न केला. 

शीख पंथाचे नववे गुरु, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त शाळेत नवीन विशेष स्पर्धा परीक्षा व ज्ञानचाचणीचे आयोजन करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देत इतिहासाची जाण आणि मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर घेण्यात आलेल्या लेखी स्पर्धा परीक्षेत वस्तुनिष्ठ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ऐतिहासिक जीवनावर आधारित प्रश्न,रिकाम्या जागा भरा,एका शब्दात उत्तरे द्या, ऐतिहासिक शब्द पूर्ण करा,त्यात अशा विविध प्रकारच्या बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश होता.प्रश्नपत्रिकेत गुरुजींचे जन्मवर्ष १६२१, शहादत वर्ष १६७५,त्यांचे कार्यक्षेत्र,धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, तसेच तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब यांच्या कारकीर्दीतील ऐतिहासिक संदर्भ यांचा समावेश करण्यात आला होता.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत परीक्षेत सहभाग नोंदवला. ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचे मूल्य दृढ झाले. स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाचे आयोजन माणिक गोमासे यांनी केले होते,भरत भलकार,भाऊसाहेब नेहरे, प्रवेश नरस्कर,दीप्ती शिरसाठ, उषा आव्हाड, अजित निखाडे,प्रशांत साबळे, मनीष जोगळेकर,अमोल जोशी व विनायक पाटील आदि शिक्षकांच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.

Previous Post Next Post