छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून कृती करणे, हीच आहे खरी शिवजयंती- मुख्याध्यापक राजेंद्र कापसे

 छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून कृती करणे, हीच आहे खरी शिवजयंती- मुख्याध्यापक राजेंद्र कापसे 




महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

सिडको:- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रेरणादायी असून छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून कृती करणे, हीच आहे खरी शिवजयंती असे प्रतिपादन माध्यमिक विद्यालय उंटवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले 
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक,विद्यालय उंटवाडी येथे नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत ३९६ वी शिवजयंती  साजरी करण्यात आली त्यावेळी अध्यक्षस्थानी असताना ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, ज्येष्ठ शिक्षक नवनीत सहारे व इतर मान्यवर उपस्थित होते पुढे राजेंद्र कापसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी नियोजन पराक्रम याबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले तर शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मांडले, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी विविध उदाहरण देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली तर केशव बोडके यांनी महाराजांचा जीवनपट मांडला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषण , नाटिका सादर केले सूत्रसंचलन मधुकर हिंडे यांनी केले याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 



Previous Post Next Post