विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासावे :- माजी विद्यार्थी गजानन नवले
सिडको:- आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी गजानन नवले यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा पारितोषिक वितरण तसेच जागतिक चिंतन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे हे होते पुढे नवले यांनी सांगितले की विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रशांत तिडके, पल्लवी तिडके, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उप मुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ शाळेतील शिक्षक संतोष देवांग, मधुकर हिंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली यावेळी अतिथी परिचय शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी, ज्येष्ठ शिक्षिका मंगला मोरे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी भारत स्काऊट गाईड विभागाच्या वतीने दिल्ली येथे घेण्यात आलेल्या स्काऊट गाईड शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलेल्या शिक्षकांनाच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर जागतिक चिंतन दिनानिमित्त शाळेतील शिक्षक मधुकर हिंडे यांनी आपली मनोगत मांडले अध्यक्षीय भाषणात नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी भारत स्काऊट गाईड चळवळ तसेच यशस्वी आयुष्य जगण्यासाठी ध्येय, आवड, निरीक्षण,जिद्द आणि प्रत्येक क्षणी जाणीव असणे आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी मोठे व्हावं आई,वडिलांचे, शाळेचे नाव मोठे करावे असे सांगत चंद्रशेखर मोंढे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले
सूत्रसंचलन शाळेतील ज्येष्ठ शिक्षका मेघा तायडे यांनी केली तर आभार पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी मानले याप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

