कुष्ठरोग जनजागृतीसाठी पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य
नाशिक (प्रतिनिधी):
राष्ट्रीय कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुधवार, दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हिरावाडी, पंचवटी येथील नाशिक लेप्रसी सेंटर व व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या प्रांगणात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणारे प्रभावी पथनाट्य सादर केले.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगाबाबत समाजातील गैरसमज दूर करण्याचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेप्रसी सेंटरमधील विविध उपक्रमांची माहिती संस्थेच्या पदाधिकारी व शिक्षक वृंदांकडून घेतली. पथनाट्य सादरीकरणानंतर सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. पथनाट्य सहभागाबद्दल पेठे विद्यालयास विद्यार्थी सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांना पथनाट्य मार्गदर्शक म्हणून, तर उपशिक्षिका कल्पना खालकर यांना विद्यार्थ्यांकडून पथनाट्याची तयारी करून घेतल्याबद्दल मार्गदर्शक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नाकील सर यांचे या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
या पथनाट्यात श्रावणी सारस्वत, आमले तृष्णा, फतरोड तनिष्क, साहिल भोसले, आदित्य साह, प्रगती डाहे, सुधांशू चौधरी, कृष्णा राजपूत आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाबद्दल नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी वसहकार्यवाह शैलेश पाटोळे यांनी सहभागी विद्यार्थी व सहकार्य करणाऱ्या कल्पना खालकर व गुरुजनांचे हार्दिक अभिनंदन केले.
.jpg)