सागरमल मोदी शाळेत मराठी दिन उत्साहात
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
(नाशिक वार्ताहर)
सागरमल मोदी शाळेत मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
यानंतर ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण केले. एकपात्री अभिनयात क्षितिजा पवार, अन्वी महाजन आणि श्लोक भगत यांनी सहभाग घेतला. “मी मराठी” या सांस्कृतिक कार्यक्रमातून मराठी भाषा व संस्कृतीचा गौरव करण्यात आला.
ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, पु. ल. देशपांडे, साने गुरुजी, शांता शेळके आदींची वेशभूषा साकारली. घोषवाक्य सादरीकरणही करण्यात आले.
१ ली च्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कविता गायन केले. किशोरी शुक्ल व छाया जाधव यांनी विद्यार्थ्यांकडून नाटकाचे सादरीकरण करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता भामरे व मंजुषा झेंडे यांनी केले. प्राजक्ता क्षीरसागर, मंगला बनकर, जयश्री फडके, सुषमा यादव, गणेश गांगोडे व कविता भामरे, मनिषा जोशी, निलिमा गायधनी, अश्विनी पगार, यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली. भावना नागपुरे यांनी मराठी भाषा गौरव दिनाची माहिती सांगितली.शेवटी स्वाती जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
