माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे शिक्षक सहविचार सभा संपन्न

 माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे शिक्षक सहविचार सभा संपन्न


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

सिडको - नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली सभेत शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी माध्यमिक शालांत परीक्षा, दत्तक पालक उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, नवभारत साक्षरता अभियान,माजी विद्यार्थी मेळावा तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ विद्यार्थी प्रवेशा बाबत मार्गदर्शन केले तर शाळेचे उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी शालेय कामकाज बाबत माहिती दिली याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,शशिकांत दंडगव्हाळ शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, प्रवीण जाधव, प्रणाली देशपांडे, मंगला मोरे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते 


Previous Post Next Post