काळाची पावले ओळखून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत योग्य तो बदल केल्यास गुणवत्ता निश्चित-श्रीमती लीना बनसोड

 काळाची पावले ओळखून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत योग्य तो बदल केल्यास गुणवत्ता निश्चित-श्रीमती लीना बनसोड 


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक-आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पारंपारिक शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झाला असून जर शिक्षण व्यवस्थेत काळाची पावले ओळखून अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी केंद्री योग्य तो बदल केल्यास गुणवत्ता निश्चित बदलते असे प्रतिपादन आदिवासी विकास आयुक्त नाशिक विभाग श्रीमती लीना बनसोड यांनी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावरून केले. त्या नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित आश्रम शाळा वेळुंजे येथील नूतन वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. पुढे त्यांनी शालेय कामकाज व अन्य नवनवीन गोष्टींचा उल्लेख करून समाधान व्यक्त केले.अति दुर्गम भागात आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जगाची स्पर्धा करण्याची क्षमता आहे, कारण त्यांचे अनुभव इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने वेगळे असतात, या विद्यार्थ्यांना संधी मिळायला हवी असे सांगितले.

 एस.एन.एस. फाउंडेशन यांच्या तर्फे आश्रमशाळा वेळुंजे येथील विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेल्या *वसतिगृहाचे उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर* आदिवासी विकास नाशिक विभागाच्या आयुक्त *मा.श्रीमती लीना बनसोड* व गॅब्रियल इंडिया लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी तसेच एसएनएस फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष *प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी गॅब्रियल इंडिया लिमिटेड कंपनीचे पंकज ऐलावडी, मनोज शेलार, नितीन देशमुख, SNS फाउंडेशनचे रामलाल बडगुजर , आदिवासी विकास विभागाच्या सहआयुक्त सौ. किल्लेदार मॅडम, संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ॲड.जयदीप वैशंपायन, कार्यवाह राजेंद्र निकम शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर, रंजना परदेशी, राजा वर्टी, देवदत्त जोशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे,उमेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी वसतिगृहाचे फीत कापून उद्घाटन करून कार्यारंभ केला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन, नंतर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. प्रमुख मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थिनींनी स्वागत स्वागत गीताने केले. यावेळी संस्थेच्या, शाळेच्या वतीने सर्व प्रमुख मान्यवरांचा सन्मान, सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक शाळा समिती अध्यक्ष सरोजिनी तारापूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा आढावा घेऊन शालेय उपक्रमाबाबत कौतुक व समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विविध शाळांमधील शिक्षक, वेळुंजे गावातील सामाजिक कार्यकर्ते समाधान बोडके, सरपंच नवनाथ बोडके, विकास बोडके, विष्णुपंत बोडके, वेळुंजे गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक ,

  संस्थेच्या बांधकाम समितीचे निमंत्रक दिनेश देवरे,आश्रम शाळेचे समन्वयक बी.डी.आहेर, मुख्याध्यापक गोपाळ उघडे, मिलिंद घाटकर ओमकार वैरागकर, एनसीसी ऑफिसर किशोर कचवे,हेमंत काशीकर, कैलास टोपले, मनीष जोगळेकर, अतुल करंजे, उपस्थित होते. 

  यावेळी सारडा कन्या विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष पल्लवी तिडके यांनी शाळेतील संगणकासाठी रंगीत प्रिंटर भेट म्हणून शाळेला दिला. तसेच मनीष जोगळेकर यांनी स्टेज साठी आवश्यक पडदा शाळेला भेट दिला. 

   जवळपास २५० विद्यार्थिनींच्या निवासाची सोय केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन प्रमुख अतिथी मा.श्रीमती लीना बनसोड व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार्य वाह शैलेश पाटोळे यांनी तर

आभार प्रदर्शन कार्यवाह राजेंद्र निकम यांनी केले.याप्रसंगी प्राथमिक व माध्यमिक विभागाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर, एसएमएस फाउंडेशनचे शिक्षक शिक्षिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post