हिंद दी चादर” शहीदी समागम वर्षानिमित्त पेठे विद्यालयात भक्तीगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद"

 “हिंद दी चादर” शहीदी समागम वर्षानिमित्त पेठे विद्यालयात भक्तीगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद"

महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक( प्रतिनिधी )

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयामध्ये “हिंद दी चादर – श्री गुरु तेग बहादुर साहिबजी” यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक Satinder Sartaaj यांनी सादर केलेल्या “हिंद दी चादर” या भक्तीगीताचे विद्यार्थ्यांना श्रवण करून देण्यात आले.

या गीतावर आधारित एकल व समूह गायन प्रकारांपैकी “श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकालावर आधारित भक्तीगीत गायन स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या सुरेल आवाजातून गुरुजींच्या त्याग, बलिदान आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवले.उत्तम गायन सादर केल्याबद्दल –मंथन रोशन भास्कर व श्रेयस मंगेश तरसे (इ. 6 ब) यां विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेपूर्वी शाळेचे उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड सर, जयश्री कुलकर्णी मॅडम तसेच कलाशिक्षिका रुपाली रोटवदकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाचे महत्त्व व स्पर्धेचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन केले.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक साहेबराव राठोड, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, बलिदानाची प्रेरणा आणि सांस्कृतिक जाणीव दृढ झाली असून शाळेतील वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी बनले.

Previous Post Next Post