राष्ट्रीय स्पर्धेत माध्यमिक विद्यालय उंटवाडी शिक्षकांचे यश

 राष्ट्रीय स्पर्धेत माध्यमिक विद्यालय उंटवाडी शिक्षकांचे यश




महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक - येथे सुपर मास्टर्स गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेतर्फे दि.२८ जानेवारी ते ३१जानेवारी असे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे सांघिक तसेच वैयक्तिक ॲथलेटिक्स, तिरंदाजी, बुद्धिबळ, पोहणे, पंजा लढत, बॅडमिंटन, डार्ट गेम, ज्युडो, कराटे, वेटलिफ्टिंग, भालाफेक , शंभर मीटर रनिंग टेबल टेनिस, लॉन टेनिस, योगा, एअर पिस्तूल आणि एअर रायफल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय उंटवाडी सिडको या शाळेतील शिक्षक संदीप भगरे यांनी भालाफेक व मिक्स रिले ४× १०० मीटर मध्ये सुवर्णपदक, शाळेतील शिक्षिका शितल मोरे यांनी ट्रिपल जम्प, मिक्स रिले ४×१०० मीटर मध्ये सुवर्णपदक तर शॉट पुट थ्रो,१०० मीटर मध्ये रौप्य पदक तसेच अश्विनी महाले यांनी १०० मीटर मध्ये सुवर्णपदक व लॉंग जम्प मध्ये रौप्यपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी करत संस्थेचे, शाळेचे नाव उंचावले नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके,नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे,नाएसो संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप,शशिकांत दंडगव्हाळ, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ज्येष्ठ शिक्षक दिलीप पवार, प्रवीण जाधव, प्रणाली देशपांडे, मंगला मोरे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे 


Previous Post Next Post