आदिवासी पारधी क्रांती संघटनेची जळगाव पोलीस अधीक्षक यांची भेट
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
जळगाव -(दि.५ फेब्रुवारी ) रोजी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन जळगाव MIDC हद्दीत राहत असणारी मुलगी आजी सोबत घरी जात असताना १६ वर्षीय मुलीला अज्ञाताने पळवून नेले ही घटना २ फेब्रुवारी रोजी MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली या मुलीचा नातेवाईक व इतरत्र शोध घेऊनही न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अद्याप पर्यंत मुलगी सापडली नाही म्हणून आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन मुलीला लवकरात लवकर मुलीच्या आई वडिलांकडे सुपुर्द करावे अशी मागणी केली व पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिले कि लवकरच मुलीला आई वडिलांकडे सुपुर्द करण्यात येईल या वेळी मुलीचे आईवडील व नातेवाईक आदिवासी पारधी क्रांती संघटना पदाधिकारी उपस्थित होते..
