माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.या प्रसंगी माजी विद्यार्थी समाधान नागरे,64 महा. बटा. एनसीसी नाशिकचे रसलदार चरण सिंग, हवालदार प्रवीण पवार, हवालदार अभिमन अहिरे,उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, शशिकांत दंडगव्हाळ ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर, जेष्ठ शिक्षक दिलीप पवार,पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ, प्रविण जाधव सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी , माजी विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र कापसे विद्यार्थ्याना संविधान निष्ठेबाबत शपथ दिली व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी सामुहिकरीत्या संविधानाचे वाचन करून घेतले. पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी कॉपी मुक्त अभियान तर पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ यांनी साक्षर भारत याबाबत विद्यार्थ्याना शपथ दिली . या याप्रसंगी इयत्ता 5वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.हस्तलिखितांचे निवेदन संगिता पाटील यांनी केले.याप्रसंगी पारितोषीक समितीच्यावतीने गुणवंत विद्यार्थी तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.क्रीडा शिक्षक संदीप भगरे यांनी सूत्रसंचलन केले .

         प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थांनी घुंगुर काठी, डबेल्स, झेंडा कवायत यावर आधारित प्रात्यक्षिक , संगीतमय कवायत, भारतीय सैन्यावर आधारित देशभक्तीपर गीत सादर केले. शालेय गीत मंच व मृण्मयी घैसास, सुनील कुलकर्णी, रसिका कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. यांच्या फर्स्ट ऑफिसर किशोर कचवे, केशव बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या एन एन सी पथकाने संचलन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शालेय पदाधिकारी,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यालयात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे उपस्थित पालक, माजी विद्यार्थी यांनी कौतुक केले.

Previous Post Next Post