ओझर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे पावर लिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश

 ओझर महाविद्यालय विद्यार्थ्यांचे पावर लिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश 



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर -मविप्र समाजाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील दि. 25 /01 /2026 रोजी नाशिक येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग शासकीय शालेय कनिष्ठ महाविद्यालय स्पर्धेत 1) ढिकले रोहन 12वी विज्ञान यांनी 53 किलो गटात गोल्ड मेडल तर (2) सिद्धांत यशवंते यांनी 83 किलो गटात सिल्वर मेडल मिळविले आहे खेळाडूंची निवड विभागीय पातळीवर झाले आहे. खेळाडूंच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी.लोखंडे यांनी दोन्ही खेळाडूंचा सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . खेळाडूंना मार्गदर्शन क्रीडाशिक्षक पी.व्ही. खाडे यांचे लाभले आहे .यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख बी. टी. शिंदे , ए .टी. टरले , उपप्राचार्य डॉ.डी. एस. बोराडे, डॉ. एस. के. आवारे उपस्थित होते.

Previous Post Next Post