वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी दाखविले विविध कलाविष्कार
ना.ए.सोसायटीच्या सी डी ओ मेरी शाळेत शालेय समिती अध्यक्ष मोहन रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र हात्ते यांनी प्रास्ताविक केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पा.शि.संघाच्या कार्याध्यक्षा देवयानी सोनार कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व नटराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. शाळेतील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला.इ.५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना,कोळीगीत, हनुमान चालीसा, मंगळागौरी,साउथ इंडियन,महाभारत, भांगडा,ऑपरेशन सिंदूर, खंडोबा,वाघ्या मुरळी, पारंपारिक खेळ,देवीचे गाणे,शिवाजी महाराज, महाराष्ट्रीयन वारकरी, अहमदाबाद प्लेन क्रश, या विविध विषयावर विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले.व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक चिमण सहारे पर्यवेक्षक साहेबराव राठोड, संस्था सहकार्यवाहक पंढरीनाथ बिरारी पा. शि.संघांचे कार्यवाह मंगेश बोढाई सहकार्यवाह सुनील जगताप उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समिती प्रमुख भारती भोये यांनी आयोजन व सूत्रसंचालन केले.सहकार्य भारती हिंडे,शोभा भदाणे यांनी केले.पारितोषिक समिती प्रमुख आरती ठकार यांनी बक्षीस वितरणाचे आयोजन केले.यादीचे वाचन कांचन खेताडे,चंचला धुळे यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळेतील सकाळ/दुपार सत्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक उपस्थित होते.आभार पर्यवेक्षक सुनील घोलप यांनी मानले.

