नाशिक एज्युकेशन सोसायटी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
दि.२०/१२/२०२५
नाशिक प्रतिनिधी:नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा स्पर्धा समितीमार्फत आयोजित संस्थास्तरीय शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव संस्थेच्या आश्रमशाळा वेळुंजे संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, ॲड.जयदीप वैशंपायण,क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी , संस्था कार्यवाह राजेंद्र निकम,संस्था कार्यकारिणी सदस्या तथा शालेय समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकर, संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे, पंढरीनाथ बिरारी, उमेश कुलकर्णी, क्रीडा समिती निमंत्रक राजेंद्र कापसे, सहनिमंत्रक अशोक शिरुडे,माजी मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शालेय पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ सत्रात उद्घाटन समारंभ शालेय समिती अध्यक्षा सरोजिनी तारापूरकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.स्वागत प्रास्ताविक सहकार्यवाह शैलेश पाटोळे , सूत्रसंचालन दीपाली पाटील तर आभार सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी यांनी मानले .तर दुपार सत्रात पारितोषिक वितरण समारंभ संस्था अध्यक्ष प्रा दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याचे स्वागत प्रास्ताविक संस्था कार्यवाह राजेंद्र निकम,सूत्रसंचालन तृप्ती बडगुजर, आभार सहकार्यवाह उमेश कुलकर्णी यांनी मानले.
प्रा दिलीप फडके, राजेंद्र निकम यांनी शिक्षकांना शिक्षकांना खूप खेळा,निरोगी रहा हा मोलाचा सल्ला दिला. क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी संस्थेच्या गीतमंचाने स्वागतगीत सादर केले.आश्रमशाळा वेळूजेच्या विद्यार्थिनी सुंदर आदिवासी गीत सादर केले.विविध खेळांमध्ये संस्थेच्या सर्व शाळांचे सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला व उत्तम यश मिळविणे.बक्षीसप्राप्त विद्यार्थी यादी वाचन सर्व क्रीडा शिक्षकांनी केले.याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महोत्सवात झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त शिक्षक, राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे शिक्षक, क्रीडा शिक्षक यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वात जास्त बक्षीस मिळविण्याचा मान सागरमल मोदी शाळा नाशिक, द्वितीय माध्यमिक विद्यालय उंटवाडी, तृतीय पेठे विद्यालय नाशिक या शाळांना मिळाला.याप्रसंगी संस्थेतील सर्व क्रीडाशिक्षक व संघ व्यवस्थापक , संस्थेच्या सर्व शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
