स्काऊट गाईड चा मुख्य उद्देश सर्वांगीण विकास करणे होय- स्काऊट शिबिर प्रमुख नवनाथ वाघचौरे
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक:- स्काऊट गाईड ही जागतिक चळवळ असून स्काऊट गाईडचा मुख्य उद्देश्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे होय. असे मत स्काऊट शिबीर प्रमुख नवनाथ वाघचौरे यांनी मांडले नाशिक मुंबई नाका येथे स्काऊट गाईड प्रगत प्रशिक्षण समारोपप्रसंगी ते बोलत होते
वाघचौरे म्हणाले शीलसंवर्धन, आरोग्य, व्यवसाय व सेवा ही स्काऊट गाईड चळवळीची चतु:सूत्री असून शारीरिक बौद्धिक ,सामाजिक, अध्यात्मिक , भावनिक विकास करून देशाचे जबाबदार नागरिक बनवणे तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही प्रयत्नशील असावे असा सल्ला दिला तर सहाय्यक शिबीर प्रमुख साहेबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून प्रगत प्रशिक्षणात सात दिवसात जे शिक्षण घेतले ते आयुष्यात उपयोगी करा असा सल्ला दिला. स्काऊटर प्रशिक्षणार्थी शिक्षक शरद शिंदे ,स्वाती बोरसे यांनी आपले मनोगत मांडले
याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक भारत स्काऊट गाईड जिल्हा संघटन आयुक्त श्रीनिवास मुरकुटे, बाळासाहेब ढोबळ, संघ प्रमुख वैभव राऊत इत्यादी उपस्थित होते
कार्यक्रमांची सुरूवात सर्वधर्मीय प्रार्थनेने करण्यात आली. सूत्रसंचालन स्काऊटर शिक्षक अजित अहिरे यांनी केले तर आभार देशमुख यांनी मानले ध्वजावतरण होऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

