"सी डी ओ मेरी हायस्कूल मध्ये द्वितीय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न"
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
सी डी ओ मेरी शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध डॉ.स्वप्निल गुजराथी व स्थापत्य बांधकाम परिक्षण विभाग व सहाय्यक संशोधन अधिकारी मेरी यशवंत बैसाणे व अर्चना कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष मोहन रानडे होते.
यावेळी डॉ.गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना विकासाचे ध्येय निश्चित करा व त्यानुसार वाटचाल करा.शालेय जीवनात वेळ वाया घालवू नका,गुरुजन व मोठ्यांचा नेहमी आदर करा.शाळेतील मागील आठवणीचा त्यांनी उजाळा सांगितला. तसेच अर्चना कोल्हे, यशवंत बैसाणे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कठोर परिश्रम करा.ध्येय निश्चित करून त्याकडे वाटचाल कराव व सुसज्ज नागरिक बना.आपल्या शाळेतील विद्यार्थी हे आज देशात विदेशात काम करताना दिसत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शाळेच्या विकासासाठी मेरी विभाग हा नेहमी सज्ज असतो तुम्ही फक्त अभ्यास करा.असे प्रतिपादन केले व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक रवींद्र हात्ते,पालक शिक्षक संघाच्या कार्याध्यक्षा देवयानी सोनार, कार्यवाह मंगेश बोढाई, संस्था सहकार्यवाह पंढरीनाथ बिरारी,उपमुख्याध्यापक चिमण सहारे,पर्यवेक्षक साहेबराव राठोड, सुनील घोलप उपस्थित होते.यशश्री कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सुनील घोलप यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

