पेठे विद्यालयात विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 पेठे विद्यालयात विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी): पेठे विद्यालयात शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे व विजय मापारी यांच्यासह मैथिली गोखले, गानू मॅडम, वंदना जोशी, वर्षा कराड आणि ज्योती कराड उपस्थित होत्या. प्राचार्य नानासाहेब मोरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित निबंध लेखन, वक्तृत्व, रंगभरण, वाद्यवादन आणि रांगोळी स्पर्धाचं आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धांमध्ये हर्षल सुतार आणि ओम घोरपडे, चित्रकला स्पर्धेत रुद्र जाधव, कार्तिकी शिरसाठ, कृष्णा संतोष राजपूत यांना, सा. वा. ना. बालभवन, नाशिक आयोजित राखी बनवणे स्पर्धेत शुभम म्हस्के,सार्वजनिक वाचनालय, नाशिक – बालभवन साने गुरुजी कथामाला यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धेत हार्दिक पुराणिक याशिवाय, विविध चित्रकला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही कार्यक्रमात उल्लेख करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा विभाग प्रमुख पूनम वाल्हेकर, जयश्री कुलकर्णी, तसेच चित्रकला शिक्षक रुपाली धारणे, मनीष जोगळेकर इतर शिक्षक, यांच्यासह विदयार्थी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Previous Post Next Post