विद्यार्थ्यांनो आपले विचार आशादायी ठेवून प्रत्येक कार्यात खेळ व अभ्यास यांच्यावर श्रद्धा भाव व आत्मविश्वास ठेवला पाहिजे

 विद्यार्थ्यांनो आपले विचार आशादायी ठेवून प्रत्येक कार्यात खेळ व अभ्यास यांच्यावर श्रद्धा भाव व आत्मविश्वास ठेवला पाहिजे -भाऊसाहेब कदम



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर -विद्यार्थी मित्रांनो खेळामुळे आपल्या शरीराला व्यायाम मिळून शरीर सुदृढ होते तसेच आपल्या शरीराची कार्यशक्ती वाढते शरीराचे व्यवस्थापन आपल्या मन व बुद्धीवर अवलंबून आहे. आपले विचार आशा वादी ठेवून प्रत्येक कार्यात खेळ व अभ्यास यांच्यावर श्रद्धा भाव व आत्मविश्वास ठेवला पाहिजे त्यातूनच आपला सर्वांगीण विकास होत असतो. असे प्रतिपादन प्रमुख अतिथी, शाळेचे माजी विद्यार्थी भाऊसाहेब कदम यांनी नवीन इंग्रजी शाळेच्या 70 व्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावरून केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष राजा वर्टी, पालक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप अहिरे, शाळेचे मुख्याध्यापक विलास बैरागी, माजी पर्यवेक्षक सुरेंद्र भानोसे, डॉ. कैलास अप सुंदे, संस्था सहकार्य वाह उमेश कुलकर्णी, कांचन जाधव, आर. टी.कदम , प्रथमेश पगारे उपस्थित होते. 

प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यारंभ केला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागत गीताने शाळेतील गीतमंचाने केले. या स्नेहसंमेलनाचे स्वागत प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक विलास बैरागी यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय व सत्काराचे निवेदन सहकार्य उमेश कुलकर्णी यांनी केले. आपल्या मनोगतातून प्रदीप अहिरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा वर्टी यांनी खूप खेळा, खूप अभ्यास करा, शाळेचे व संस्थेचे नाव उज्वल करा असे सांगितले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन सुहानी पवार यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, इयत्ता वार प्रथम आलेले विद्यार्थी, सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवलेले विद्यार्थी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता दामले यांनी तर आभाराचे काम उमेश कुलकर्णी यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी मच्छिंद्र गाडेकर, रोहिणी कदम, संगीता वळवी, चैताली शिरसागर, श्रीमती आढाव, शितल ठोंबरे, हरिश्चंद्र बागुल, चंद्रभान गायकवाड, योगेश बंदरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या वेळी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Previous Post Next Post