पेठे विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साही पारितोषिक वितरण सोहळा

 पेठे विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उत्साही पारितोषिक वितरण सोहळा

महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात, कारंजा येथे २०२५-२६ च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत, बजरंग बली हनुमान पूजन आणि प्रज्वलनाने झाली. क्रीडा शिक्षक अमोल जोशी यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. नाशिक एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती अध्यक्ष राजा वर्टी आणि शाळेचे माजी विद्यार्थी व नामांकित बिल्डर विजय कोठारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी अतिथींचा सत्कार केला, तर मुख्याध्यापक गंगाधर बदादे यांनी इतर मान्यवरांचा सत्कार केला. स्वागत व प्रास्ताविक शैलेश पाटोळे यांनी सादर केले.महोत्सवात शटल रन, धावणे, लंगडी,रस्सी खेच, डॉस बॉल, इ.सांघिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन झाले होते. पारितोषिक वितरणात यश झणकर, आर्यन जाधव, जयश्री शेवरे, दर्शना निखडे, रोशन गावित, जयराम थवेल, तेजस भुसारे, प्रथमेश कराड, हर्षल पवार, विष्णू वाडगे, प्रांजल तळपे, जयश्री गवळी, लावण्या अल्बाड, गौरी चौधरी, वेदिका जाधव, संगीता वाल्हेरी, पायल गावित, हेमा गावित, प्रज्ञा हिरकुड, भारती पवार, सुभाष थावील, अक्षय पावरा यांच्यासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू जाधव हर्षाली, गौरी चौधरी, जाधव सपना, हुमणू मानवी, दर्शन भंडारी, सय्यद खुशरान, ऋतुजा कराड, आर्यन जाधव, अमृता शिंदे, दीपा ददेल, करणीकर करण यांना पदके व बक्षिसे देण्यात आली.राजा वर्टी यांनी मनोगतात हरण्याचे कारण शोधून प्रयत्न करत राहण्याचा संदेश दिला आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा सहभागाचे कौतुक केले. विजय कोठारी यांनी शाळेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जीवनात ध्येय निश्चित करण्याचा, खेळांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. अध्यक्ष देवदत्त जोशी यांनी हार-जीत ही नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत जिंकण्यासाठी अभ्यास करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात संस्था कार्यवाहक राजेंद्र निकम, मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, विजय मापारी, पालक शिक्षक संघ पदाधिकारी वर्षा कराड, ज्योती कराड उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल जोशी यांनी केले, तर आभार शैलेश पाटोळे यांनी मानले. आयोजन क्रीडा शिक्षक अमोल जोशी, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले.

Previous Post Next Post