सी.डी.ओ.मेरी हायस्कूल शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिननिमित्त अभिवादन

 सी.डी.ओ.मेरी हायस्कूल शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिननिमित्त अभिवादन


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ना.ए.सोसायटीच्या,मेरी हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र हात्ते यांच्या अध्यक्षतेखाली महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून बुद्ध वंदनेने केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजय हिरे,तारा घोटेकर यांनी विद्यार्थ्यांना आंबेडकरांच्या जीवन चरित्र विषयी माहिती सांगितली.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.शिक्षणाचे जीवनातील महत्त्व पटवून सांगितले. व्यासपीठावर पर्यवेक्षक साहेबराव राठोड,सुनिल घोलप शिक्षक प्रतिनिधी पंढरीनाथ बिरारी जेष्ठ शिक्षक नितीन जाधव, भारती भोये,सुनंदा जाधव,भारती हिंडे उपस्थित होते.विद्यार्थी मनोगतामध्ये रिद्धीका काकविपुरे,पूजा पाटील, गौरी खरे,ज्ञानेश्वरी सावकार,तेजस्विनी चव्हाण,वेदिका भुजबळ,तन्मय विघे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.आयुष धोत्रे,आदिती भोसकर,एंजल दोंदे यांनी बुद्ध वंदना तर जान्हवी थोरात हिने कविता सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भार्गवी काळे,तन्वी बर्डे या विद्यार्थ्यांनी केले.

या कार्यक्रमाचे नियोजन सकाळ व दुपार सत्रातील शिक्षिका निलम पाटील,पल्लवी ढोले,सुजाता पवार यांनी केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तन्वी धुमाळ हिने सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post Next Post