बॉडी बिल्डींग स्पर्धेत ओझर महाविद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

 बॉडी बिल्डींग स्पर्धेत ओझर महाविद्यालयाच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी


महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

ओझर (मिग )

मविप्र समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा खेळाडू दर्शन वाघमारे याने अतिशय चमकदार कामगिरी करून दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी कल्याण येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डींग स्पर्धेत ६५ किलो वजन गटात ‘सुवर्ण पदक’ मिळविले आहे. तसेच नाशिक जिल्हा विभागीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत देखील ६५ किलो वजन गटात ‘सुवर्ण पदक’ मिळविले आहे. या सुवर्णमय कामगिरी केल्याबद्दल दर्शनची दि. १०-११ डिसेंबर २०२५ दरम्यान श्रीरामपूर येथे होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉडी बिल्डींग स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड झाली आहे. 

तसेच ओझर महाविद्यालयाचा खेळाडू अभिषेक थोरात याने नाशिक जिल्हा विभागीय बॉडी बिल्डींग स्पर्धेत ६५ किलो वजन गटात ‘कांस्य पदक’ मिळविले आहे. सदर स्पर्धेत दर्शन वाघमारे व अभिषेक थोरात यांच्या दैदिप्यमान कामिगिरीबद्दल नाशिक शहर व परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. 

त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.डी.लोखंडे यांनी या दोन्ही खेळाडूंचा अभिनंदनपर सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी.एस.बोराडे, क्रीडा संचालक डॉ. दिपक सौदागर, प्रा.पी.व्ही.खाडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post