वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय वार्षिक पारितोषिक समारंभ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी प्रसाद येवले (बांधकाम उद्योजक ) ,माजी विद्यार्थीनी प्रितम शिरुडे (फिजिओथेरपिस्ट)हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे ,उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप , पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ,पा. शि.संघ कार्यवाह प्रविण जाधव, पालक शिक्षक संघउपाध्यक्ष दिलीप रौंदळ, पालक शिक्षक सचिव सारिका परदेशी , शालेय पंतप्रधान रूद्र घरटे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           प्रमुख पाहुणे प्रसाद येवले यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने अभ्यास करा. असा सल्ला दिला तर माजी विद्यार्थीनी प्रितम शिरुडे यांनी अभ्यासासोबत रोज नियमित व्यायाम, योगा करून चांगल्या आरोग्याच्या सवयी अंगी बाळगा असा मोलाचा सल्ला दिला.आपले शालेय अनुभव व्यक्त केले. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक प्रविण जाधव व जेष्ठ शिक्षिका चारुशीला पत्की यांनी करून दिला. उपमुख्याध्यापक विजय मापारी याने शालेय अहवालाचे वाचन केले . सूत्रसंचलन रसिका कुलकर्णी यांनी केले तर आभार शिक्षक पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी मानले .पारितोषीक समितीच्या वतीने मंगला मोरे, मेघा तायडे , केतकी गोविंद, निरुपमा ठाकूर, मृण्मयी घैसास, प्रिया कुलकर्णी,अश्विनी भामरे, अमोल भडके,चेतन सोनवणे , सुरेंद्र साबळे, यांनी कामकाज पाहिले.निरुपमा ठाकूर व अमोल भडके यांनी संस्था ठेवीदार व देणगीदार , आजी माजी शिक्षक , पालक यांचे यादी वाचन करून ऋण व्यक्त केले . प्रिया कुलकर्णी, केतकी गोविंद, मेघा तायडे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यादीचे वाचन केले.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे , संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. रसिका कुलकर्णी,अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले.याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांचा उपक्रमशील मुख्याध्यापक , आदर्श वर्गशिक्षक चारुशीला पत्की , वाचक शिक्षक म्हणून अंकुल देवरे, ,सर्वात जास्त बक्षीस मिळवणारा वर्ग म्हणून इयत्ता 8वी फ चे विद्यार्थी त्यांचे वर्गशिक्षक प्रिया कुलकर्णी, आदर्श वर्ग म्हणून इ 10 वी अ वर्गशिक्षक नितीन धायगुडे, हिंदी अध्यापक म्हणुन केतकी गोविंद , चेतन सोनवणे तसेच याप्रसंगी विविध शालेय स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी विद्यार्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले त्याचे सूत्रसंचलन हेमंत भुसारे, रसिका कुलकर्णी,अबोली अकोलकर यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारितोषिक समिती , सांस्कृतिक समिती सदस्य सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post Next Post