ओझर महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न
डिस्टील एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या संस्थेच्या वतीने नाशिक येथील 31 नामांकित कंपन्यांसाठी मुलाखती घेण्यात आल्या डिस्टिल एज्युकेशन संस्थेचे मॅनेजर प्रदीप मोरे उपस्थित होते .नाशिक जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे 318 विद्यार्थी उपस्थित होते .बारावी ,आय टी आय डिप्लोमा ,डिग्री असे अनेक शाखांमधील विद्यार्थी मुलाखतीसाठी आलेले होते .
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी डी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना करिअर बद्दल माहिती दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी खांदवे यांनी केले. रोजगार मेळावा यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागाचे प्रमुख श्रीमती कदम मॅडम डॉ. पी बी चोबे, डॉ. वाय के चौधरी डॉ. एस पी भोसले , प्राध्यापिका हिरे मॅडम व नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील पदवीधर रोजगार मिळण्यासाठी उपस्थित होते.
