महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये भाजपला भरघोस यश; मोदींकडून मराठीत ट्विट करत जनतेचे आभार
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल रविवारी 21 डिसेंबर 2025 रोडी हाती आले आहेत. यामध्ये महायुतीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपने समोर आलेल्या आकडेवारीनुसार 288 पैकी 117 नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर बाजी मारली आहे. त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमधून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले .
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो. असं म्हणत मोदींनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आणि पुन्हा एकदा विकासाचा शब्द दिला.
