पेठे विद्यालय: स्पर्धा विजेत्यांचा सत्कार
महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा
नाशिक (प्रतिनिधी) :यशवंतराव पटांगण गंगाघाट येथे नाशिक येथील पेठे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे निबंध, चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण सपन्न झाले. यशवंतराव महाराज साधू देवमामलेदार, गंगाघाट, नाशिक संस्थान यांच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते..हस्ताक्षर स्पर्धेत अनन्या सोनवणे, देवेंद्र जाने; चित्रकला स्पर्धेत शुभम सटले, कृष्णा राजपूत, देवेंद्र जाणे; तर निबंध स्पर्धेत ओम घोरपडे, ऋतुजा कराड, यश शिरसाठ, हिमांशू शेवाळे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.कार्यक्रमास मार्गदर्शक गुरुजन जयश्री कुलकर्णी, मनीष जोगळेकर, पूनम वाल्हेकर तसेच उपस्थित होते.पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक भागवत सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सकाळ व दुपार सत्रातील बाह्यस्पर्धा तसेच चित्रकला विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.