सागरमल मोदी शाळेचे ८८ वे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात

 सागरमल मोदी शाळेचे ८८ वे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात

1500 विद्यार्थ्यांनी दाखविला कलाविष्कार

-चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घडविले गुणदर्शन 




दि. 9 डिसेंबर 2025

(नाशिक वार्ताहर)-नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून झाली.हर्षभराने करितो स्वागत हे स्वागतगीत क्रांती बोराटे व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. रंगमंच पूजन राहुल चव्हाण यांनी केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पारितोषिक समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे संस्था ,उपाध्यक्ष ॲड.जयदिप वैशंपायन,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्षा रंजना परदेशी, संस्था कार्यवाह तथा शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र निकम, संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे,पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर बदादे, उंटवाडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे,पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष कोमल जोशी,शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे, मनिषा जोशी,विजया दुधारे,शालिनी बच्छाव आदी उपस्थित होते.आपल्या मनोगतातून शाळेचे माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी पर्यावरणाचा संदेश देऊन सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणातून शालेय समिती अध्यक्षा रंजना परदेशी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रस्तुत कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी तर सूत्रसंचालन हर्षल कोठावदे यांनी केले. कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राजक्ता क्षीरसागर यांनी करून दिला. आभार शिक्षक प्रतिनिधी अशोक शिरुडे यांनी मानले शालेय अहवालाचे वाचन विजया दुधारे यांनी तर पालक शिक्षक संघाच्या अहवालाचे वाचन कोमल जोशी यांनी केले.पारितोषिक यादीचे वाचन उषा जोपळे, अनघा कुलकर्णी,स्वाती महाजन,किशोरी शुक्ल यांनी केले. याप्रसंगी १०४ गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यानंतर १ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याचा कलाविष्कार दाखविला.सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सारिका सूर्यवंशी,नलिनी पाडवी, सुषमा यादव, वैशाली खिल्लारी यांनी केले. आया रे आया तुफान,कोळी गीत, टिपरी नृत्य,आदिवासी नृत्य, बम बम बोले, गोंधळी नृत्य,देशभक्तीपर गीते, महिलांची गगन भरारी असे विविधांगी नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. प्रेक्षागृहात हजारो पालकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.

Previous Post Next Post