ग्रंथ सप्ताह समारोप व महापरिनिर्वाण दिन साजरा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय सप्ताह समारोप समारंभ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र 8 चे केंद्रप्रमुख भास्कर साळवे,माजी विद्यार्थी योगेश गवळी (उद्योजक),महेश वाघ (आर्थिक सल्लागार)हे उपस्थित होते.याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे ,उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर , पालक शिक्षक संघ सचिव प्रविण जाधव, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ , ग्रंथपाल अर्चना देवरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.प्रमुख पाहुणे भास्कर साळवे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, पुस्तक वाचन याबाबत विचार व्यक्त केले व अधिक पुस्तके वाचा असा सल्ला दिला.माजी विद्यार्थी योगेश गवळी, महेश वाघ यांनी ग्रंथ सप्ताह अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले व शाळेविषयी ऋण व्यक्त केले.नितीन धायगुडे, शांमवी नेटावते, पूर्वा शिरसाठ यांनी आंबेडकरांचे सामाजिक विषमता यावर केलेले कार्य याविषयी विद्यार्थांना माहिती सांगितली.संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी स्वागत उपमुख्याध्यापक विजय मापारी यांनी केले, प्रमुख पाहुण्याचा परिचय पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, ज्येष्ठ शिक्षक प्रविण जाधव यांनी करून दिला.ग्रंथपाल अर्चना देवरे यांनी ग्रंथ ग्रंथोत्सवाचे निवेदन केले.पारितोषिक समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्याच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.यादी वाचन निरुपमा ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली सुपे यांनी केले. रसिका कुलकर्णी, अबोली अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीतमंचाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.


