शिस्त,दिशा आणि एकाग्रता म्हणजे यश~आहारतज्ञ श्रेया जोशी

 शिस्त,दिशा आणि एकाग्रता म्हणजे यश आहारतज्ञ -:श्रेया जोशी



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

शालेय जीवनात अभ्यास बरोबर विविध प्रकारचे खेळ खेळल्याने आत्मविश्वास,जिद्द,ऊर्जा मिळते. शिस्त,मार्गदर्शन,समर्पणभाव वाढीस लागतो म्हणजेच शिस्त,दिशा आणि एकाग्रता यांचा संगम म्हणजे यश होय असे प्रतिपादन नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मा.रा. सारडा कन्या शाळेत क्रीडा बक्षिस वितरण समारोप समारंभप्रसंगी माजी विद्यार्थिनी राष्ट्रीय खेळाडू व आहारतज्ञ श्रेया समीर जोशी यांनी केले.त्यापुढे म्हणाल्या की शाळेने मला घडविले.आज माझ्या शाळेतील आठवणी जागृत झाल्या. तुम्हीही प्रत्येक खेळात भाग घ्या आणि भविष्यात करिअर करताना खेळासही प्राधान्य द्या.जेणेकरून आरोग्य सुदृढ राहील असे सांगून यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून शाळेत शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्षा सरोजिनी तारापुरकर या होत्या.याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, उपमुख्याध्यापिका मनीषा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी रामदास चव्हाण, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा पल्लवी तिडके,शालेय समिती सदस्या मंगला निकम,गीतांजली वैष्णव,मोहिनी तुरेकर,समीर जोशी,मंदार गायधनी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शालेय समिती अध्यक्षा सरोजिनी

तारापुरकर यांनी खेळामुळे सांघिक भावना जागृत होतात.खेळात हार जीत न मानता किमान एक खेळात तरी आपण भाग घ्यावा असे सांगून विजेत्यांचे अभिनंदन केले.प्रारंभी ओंकार वैरागकर नीता खैरनार यांनी गायलेल्या क्रीडा गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वागत व प्रास्तविक मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ यांनी केले.पाहुण्यांचा परिचय दिलीप अहिरे यानी करून दिला.

वार्षिक क्रीडा अहवालाचे वाचन क्रीडा शिक्षक संजय मेहरखांब यांनी केले.यानंतर या महोत्सवात् सांघिक व वैयक्तिक व सांघिक कबड्डी, डोजबॉल,लंगडी,जंपरोप,बॉल ब्रो

रस्सिखेच,बुद्धिबळ,100मिटर धावणे,शटलरन इ.स्पर्धातील बक्षीस पात्र 102 विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

यादी वाचन कविता पवार, अनिता जाधव,दिलीप अहिरे यांनी केले.सुत्रसंचालन सुप्रिया देशपांडे तर संजीवनी निकम यांनी आभार मानले.अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम पार पडला. महोत्सवात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Previous Post Next Post