माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात
नाशिक:- नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे नाएसो संस्था उपाध्यक्ष तथा शाळेचे शाळा समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ सप्ताह अंतर्गत शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली स्पर्धा ही चार गटात व प्रत्येकी पाच फेऱ्यांमध्ये घेण्यात आली
यांत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नाशिक जिल्हा तसेच मराठी साहित्यकार, इत्यादी बाबत प्रश्नः विचारण्यात आले ज्यात विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण हे ग्रंथ उद्घाटन समारोप प्रसंगी देण्यात येणार असून याप्रसंगी शाळेतील उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ, ज्येष्ठ शिक्षक प्रवीण जाधव, ज्येष्ठ शिक्षिका प्रणाली देशपांडे, मंगला मोरे , शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक हेमंत भुसारे,शितल मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले
