विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न



महाराष्ट्र सुवार्ता वृत्तसेवा 

   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय, उंटवाडी येथे संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थांच्या विविध कला गुण तसेच सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध गुण दर्शन सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी प्रसाद येवले (बांधकाम उद्योजक ) , माजी विद्यार्थिनी प्रितम शिरुडे (फिजिओथेरपिस्ट) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक राजेंद्र कापसे ,उपमुख्याध्यापक विजय मापारी, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप , पर्यवेक्षक शशिकांत दंडगव्हाळ,शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेर ,पा. शि.संघ कार्यवाह प्रविण जाधव, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दिलीप रौंदळ , पालक शिक्षक संघ सचिव सारिका परदेशी,पा शि संघ सदस्य , शालेय पंतप्रधान रूद्र घरटे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बडबडगीत, निसर्ग गीत , देशभक्तीपर गीत , नाट्य , लोकनृत्य, शेतकरी नृत्य , विविधतेत एकता, मोबाईल चे परिणाम सादर करणारी गीते सादर केली .प्रेक्षक म्हणून विद्यार्थी ,पालक यांनी उदंड प्रतिसाद दिला.याप्रसंगी वर्गशिक्षक दिपाली पाटील व स्मिता सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली इ 7 वी ड व 8 वी अ च्या विद्यार्थांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या गीतास पर्यवेक्षक सूर्यभान जगताप यांनी विशेष बक्षीस दिले.
     सूत्रसंचलन हेमंत भुसारे, रसिका कुलकर्णी,अबोली अकोलकर यांनी केले .सांस्कृतिक समितीच्या वतीने केतकी गोविंद ,चारुशीला पत्की , निरुपमा ठाकुर,अबोली अकोलकर , रसिका कुलकर्णी , मृण्मयी घैसास, स्वाती पवार , राकेश सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.
        संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मोंढे , संस्था कार्यवाह राजेंद्र निकम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
Previous Post Next Post